MIT-WPUमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन हिंसक वळणावर! प्राध्यापक-विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, पोलिसांचा बंदोबस्त
परीक्षेला बसूनही विद्यार्थ्यांना पुन्हा नापास करण्यात आल्याचा आरोप करत विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात एका राजकीय पक्षाच्या युवा शाखेचे सदस्यही सहभागी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्राध्यापकाने विद्यार्थ्याला कथितरित्या कानशिलात मारल्यानंतर परिस्थिती चिघळली. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही प्रत्युत्तर दिल्याचा आरोप असून, प्राध्यापकाला ४-५ वेळा कानशिलात मारल्याचे सांगितले जात आहे. 😱
घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कॅम्पसमध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आले.
या प्रकारामुळे परीक्षेच्या निकालांबरोबरच आंदोलन हाताळण्याच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. 👀
📌 MIT-WPUमधील या प्रकारावर विद्यापीठ प्रशासनाची भूमिका काय असणार?
MIT-WPUमध्ये आंदोलनाला हिंसक वळण!
#MITWPU #MITWPUPune #Pune #Kothrud #PuneNews #StudentProtest #StudentAgitation #CollegeNews #ExamResults #StudentNews #CampusNews #BreakingNews #LatestNews #ViralNews #TimesOfMaharashtra