शहरात दहशत निर्माण करणाऱ्या मनोज ऊर्फ मन्या ऊर्फ छत्री लक्ष्मण डोंगरे वय ३५ वर्ष, राहणार कपिलनगर या कुख्यात गुंडाला पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपीवर खून करण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, विनयभंग, घरफोडी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.