हिंगणघाट: नांदगाव येथील कर्जाच्या विवंचनेतून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याने सेवाग्राम रुग्णालय उपचारादरम्यान मृत्यू
नांदगाव येथील सतिश वैद्य यांनी मंगळवारी कर्जाच्या विवंचनेतून विष प्राशन केले होते.त्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालय दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मृतक सतिश वैद्य यांच्याकडे साडेचार एकर शेती असुन ते शेतीच्या मिळकतीतून परीवाराचा उदरनिर्वाह करीत होते.यंदा त्यांनी आपल्या शेतात कपाशीच्या पिकाची लागवड केली होती.मात्र पाऊस वेळेवर न आल्याने कपासीचे पिक उगवले नाही. त्यातच सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेल्या त्यांनी आत्महत्या केली असे बोलल्या जात आहे