हिंगणघाट: विठ्ठल भक्तांसाठी शहरातील आगारातून पंढरपूराठी रोज एक लालपरी सुटणार:बसची पुजा करून बस पंढरपूरकडे रवाना
हिंगणघाट आगाराच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी आज २७ जुन पासुन १५ दिवसांसाठी रोज एक लालपरी सोडण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून या बसची पुजा करून हि बस पंढरपूरकडे रवाना करण्यात आली आहे.हि सब रोज सकाळी ८ वाजता निघणार असुन रात्री ११ वाजता पंढरपूरला पोहचार आहे.या रोज पंढरपूरला जाणाऱ्या बसचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगाराकडून करण्यात आले आहे