हिंगणघाट: गाडगेबाबा व्यायाम शाळेजवळ शस्त्र बाळगून दरोडा टाकण्याच्या उद्देश बसून असलेल्या ७ जणा विरोधात गुन्हा दाखल:१ लाख ८० ७००
हिंगणघाट शहरातील गाडगेबाबा व्यायाम शाळेजवळ टाका ग्राऊंड येथे शस्त्र बाळगून बसणाऱ्या ७ जणा विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून शस्त्र व दोन दुचाकीसह १ लाख ८० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पोलीस रात्रगस्त पेटोलिंग करीत असताना त्यांना काही इसम गाडगेबाबा व्यायाम शाळेजवळ टाका ग्राऊंड जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत व येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती.