केजच्या टाकळीतील विलास घुले मारहाण प्रकरणाचा CCTV व्हायरल; सोशल मीडियावर संतापाची लाट...
.
.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले मारहाण प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. विलास घुले यांना करण्यात आलेल्या बेदम आणि अमानुष मारहाणीचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये आरोपींची क्रूरता स्पष्टपणे दिसत असून, हा थरार पाहून संपूर्ण बीड जिल्ह्यातून आणि सोशल मीडियावरून आरोपींवर कडकडात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नातेवाईकांनी आधीच मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला असताना, आता हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने पोलिसांवरील दबाव आणखी वाढला आहे. नेमका काय आहे या व्हिडिओमधील थरार?
.
.
.
#VilasGhule #CCTVViral #KajNews #BeedCrime #TakliNews #CrimeNewsMarathi #BreakingNews #JusticeForVilasGhule
Haveli, Pune | Jun 23, 2026