सेलू: घोराड येथे गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला दुचाकीसह सेलू पोलिसांनी केली अटक, ₹48,400 चा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Oct 2, 2024 दुचाकीवर गावठी मोहा दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या एकाला सेलू पोलिसांनी अटक केली. त्याच्या कडून दुचाकी वाहनासह 48 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ता. 30 सोमवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास सेलू-हिंगणी रोडवर घोराड जवळ करण्यात आली. विलास वल्के रा. वार्ड क्रं.4 सेलू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती आज ता. 2 ऑक्टोबर बुधवारला सेलू पोलिसांनी दिली.