सेलू: मोहगाव (शिवनगाव) शिवारात गावठी दारूचा मोहा रसायन सडवासह २ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल नष्ट, सेलू पोलिसांची कारवाई
Seloo, Wardha | Oct 1, 2024 पोलिसांनी धाड टाकून गावठी दारू काढण्यासाठी तयार करण्यात आलेला मोहा रसायन सडवासह 2 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. यात आरोपी शुभम अरुण पिंपळे वय 28 वर्ष रा. शिवणगाव याला अटक करण्यात आली असून ही कारवाई ता. 30 सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मोहगाव (शिवनगाव) शिवारात सेलू पोलिसांनी केली. अशी माहिती आज ता. 1 ऑक्टोबर मंगळवारला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.