सेलू: सेलूच्या विकास चौकात महाविकास आघाडीचं जनआक्रोश आंदोलन; आंदोलनादरम्यान अभ्युदय मेघे यांनी काढली आमदारांची लायकी
Seloo, Wardha | Oct 1, 2024 महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आज ता. 1 ऑक्टोबर मंगळवारला दुपारी 12 वाजता सेलूच्या विकास चौकात जनआक्रोश धरणे आंदोलन केलंय. यावेळी विद्यमान आमदारांवर बोलतांना काँग्रेस नेते अभ्युदय मेघे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. वर्ध्याच्या आमदाराला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकारच नाही. 10 वर्षात स्थानिक आमदाराने शेतकऱ्यांचा एकही मुद्दा विधानसभेत लावून धरला नाही. त्यामुळे त्यांची निवडणुकीत उभी राहण्याची लायकीच नाही.