हिंगणघाट: नागपूर वरुन काढण्यात आलेल्या मंडल जनगणना यात्रेचे शहरात मोठ्या उत्साहात स्वागत
नागपूर येथून ओबीसी संघटनांच्या सहयोगाने काढण्यात आलेल्या मंडल जनगणना यात्रेचे हिंगणघाट शहरात आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.सयोजक उमेश कोराम यांच्या नेतृत्वात हि मंडल जनगणना यात्रा निघाली आहे.ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी हि यात्रा काढण्यात आली आहे.यावेळी स्वागत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व ओबीसी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते..