हिंगणघाट: निखाडे मंगल कार्यालयासमोरुन चोरुन नेलेली दुचाकी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला अटक करून केली जप्त
हिंगणघाट शहरातील निखाडे मंगल कार्यालयासमोर भोलानाथ निखाडे याची उभी ठेवून असलेली दुचाकी क्रमांक एम एच ३२ ए.टी ३१९० अज्ञात चोरट्यांनी चोरून नोल्याची तक्रार हिंगणघाट पोलिस ठाण्यात दिली होती.पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आता चोरट्यांचा छडा लावत नंदोरी रोड वरील महाकालीनगरी येथून आरोपी प्रवीण चिरकुट गायकवाड वय ३४ वर्ष राहणार कुंड शेगाव यास अटक करून त्याच्या ताब्यातून दुचाकी जप्त केली.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली आहे.