हिंगणघाट: पिपरी येथे घरात ठाण मांडून बसलेल्या नागाला जेरबंद करून सर्पमित्राने दहशतीतून केली कुटुंबियांची सुटका
पिपरी येथील रामभाऊ लोखंडे यांच्या घरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भल्लामोठा नाग स्वयपाक खोलीत दिसताच कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.या सापाला पाहून घरातील सदस्य घराबाहेर पडले.या घटनेची माहिती गावातील सर्पमित्र वैभव देहारी यांना देताच त्यांनी तातडीने घर गाठून मोठ्या सिताफीने सापाला जेरबंद करताच लोखंडे कुटुंबियांनी सुटकेचा निस्वास घेतला.रविवारी सकाळी १० वाजता सर्प मित्रांनी गिरड येथील वनविभागाच्या कार्यालयात सापाला आणून नोंद करीत या सापाला खुर्सापार जंगलात सोडून दिले