हिंगणघाट: सेलू गावाजवळ नाकाबंदी करुन पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई
हिंगणघाट शहर पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने सेलू गावाजवळील महादेव मंदिरजवळ नाकाबंदी करुन अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करीत दुचाकी क्रमांक एमएच ३२ एच ९०५८ सह ८६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनूराग जैन, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशाप्रमाणे पोउपनि सूनिल राम, डिबी पथकाने केली आहे.