हिंगणघाट: शहरातील तुळसकर फार्मसी कॉलेजच्या बी.फार्म प्रथम सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांची पहिल्याच वर्षी निकालामध्ये उत्तुंग भरारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, बी. फार्म प्रथम सेमिस्टर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये विद्या विकास शिक्षण संस्था,हिंगणघाट द्वारा संचालित तुळसकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रथम सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादित केले. विशेष म्हणजे महाविद्यालयाचे हे प्रथमच वर्ष होते, ज्याप्रमाणे प्रवेशावेळी विलक्षण अश्या ५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केले.असुन सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.