बर्फाळ समुद्रात 2 दिवस उलटलेल्या बोटीला धरून राहिला 15 वर्षांचा मुलगा! अखेर सुटका
अमेरिकेतील अलास्कामध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. १५ वर्षांचा मुलगा बर्फाळ समुद्रात उलटलेल्या बोटीला जवळपास दोन दिवस धरून राहिला. कडाक्याची थंडी आणि जीवघेण्या परिस्थितीतही त्याने हार मानली नाही.
अखेर बचाव पथकाने या मुलाची सुखरूप सुटका केली. मात्र, या भीषण अपघातात त्याचा मोठा भाऊ आणि एका नातेवाईकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूच्या छायेतही दोन दिवस संघर्ष करत जगण्याची जिद्द दाखवणाऱ्या या मुलाची कहाणी धैर्य आणि चिकाटीचे उदाहरण ठरली आहे.
2 दिवस बर्फाळ समुद्रात मृत्यूशी झुंज!
उलटलेल्या बोटीला धरून वाचला 15 वर्षांचा मुलगा
अलास्कात भीषण बोट दुर्घटना; दोघांचा मृत्यू
भावाचा मृत्यू, तरीही मुलाची जगण्याची जिद्द
#Alaska #USA #AlaskaNews #Rescue #SurvivalStory #ViralNews #WorldNews #Bravery #Survival #NewsUpdate
Pune City, Pune | Sep 12, 2026