भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 7 ऑगस्ट रोजी भिवापूर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या सुंगधीत तंबाखूची अवैधरित वाहतूक केली जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवापूर पोलिसांनी सापडचण कारवाई केली आरोपी नामे कमालुद्दीन करीमुद्दीन सय्यद हा चार चाकी टाटा एस सह मिळून आला पंचायत समक्ष वाहनाची झलकी घेतली असता त्याच्याकडे सुगंधी तंबाखू मिळून आला