हिंगणघाट: नांदगाव उडाण पुलावर पडलेल्या भगदाडासाठी राकॉपा शरद पवार पक्षाचे रास्त रोको आंदोलन:वाहनांच्या लांबलचक रांगा
हिंगणघाट येथे शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील नांदगाव चौकातील उडाण पुलावर पडलेल्या भगदाडा संबधी चौकशीसह कारवाईच्या मागणीसाठी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पावसाच्या सरी बरसत असतानाही आंदोलक ठाण मांडून बसले होते.नॅशनल हायवे अथॉरीटीच्या अधिकाऱ्यांची भेट देत आंदोलकांशी चर्चा केली यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता