नागपूर शहर: धक्कादायक! डागा रुग्णालयातून अवघ्या एका दिवसाचे बाळ चोरीला; पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरू
नागपूरमधील डागा रुग्णालयातून एका दिवसाचे नवजात बाळ चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू असून, संशयित महिलेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ही घटना नागपुरातील प्रतिष्ठित डागा रुग्णालयात घडली. बाळाची आजी बाळाला इंजेक्शन देण्यासाठीघेऊन गेल्या होत्या, त्याचवेळी बुरखाधारी महिला तिथे आली.तिने ५०० रुपयांचे आमिष दाखवून किंवा इतर कारणाने बाळ पळविले. बाळ हे अवघ्या एका दिवसाचे असून ती मुलगी आहे.