आरोग्य यंत्रणा की कुस्तीचा आखाडा? शासकीय केंद्रावर प्रसूती कोण करणार यावरून डॉक्टर-नर्समध्ये राडा;
.
.
महाराष्ट्र: शासकीय आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाची आणि अमानुशतेची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी आलेल्या एका गरोदर महिलेची डिलिव्हरी नेमकी कोण करणार, यावरून कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि नर्स यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघींमध्ये थेट राडा सुरू झाला. एकीकडे आरोग्य कर्मचारी आपसात भांडण्यात मग्न असताना, दुसरीकडे प्रसूती कळा सोसणाऱ्या त्या असहाय्य महिलेची मोठी हेळसांड झाली. शेवटी कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्या महिलेला अत्यंत गंभीर अवस्थेत दुसऱ्या खाजगी रुग्णालयात जावे लागले. या लाजिरवाण्या प्रकारामुळे शासकीय आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रचंड टीका होत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
.
.
.
#HealthDepartment #GovernmentHospital #MedicalNegligence #MaharashtraNews #HealthMinistry #PublicOutrage #DoctorVsNurse #BreakingNews #SarkariYantrana #PatientSafety
Haveli, Pune | Jun 14, 2026