उपजिल्हा रुग्णालयातच तुफान राडा...! दगडफेक आणि हाणामारीने उडाली खळबळ; व्हिडिओ व्हायरल...
जालना जिल्ह्यातील अंबड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीच्या वादाचे रूपांतर काही क्षणांतच दगडफेकीत झाले आणि दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले.
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी घाबरून गेले. अनेकांनी सुरक्षिततेसाठी इमारतीत आश्रय घेतला. संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हाणामारीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क
#Jalna #Ambad #HospitalFight #ViralVideo #MaharashtraNews #CrimeNews #TrendingNews #PoliceInvestigation #NewsUpdate