रामटेक: सींदेवानी खिडकी शिवारातील वन तळ्यात बुडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Aug 13, 2026 घरातून निघून गेलेल्या एका बेपत्ता 70 वर्षीय महिलेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सींदेवानी खिडकी शिवारातील वन तळ्यात मिळून आला. ही घटना 12 ऑगस्ट ला सायंकाळी समोर आली. मृतक महिलेचे नाव तानी छनू वरठी वय 70 वर्ष राहणार सींदेवानी असे आहे. ती 11 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली होती रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्यात आला असता बुधवारला सायंकाळी तिचा मृतदेह वन तलावात आढळला. गुरुवार दिनांक 13 ऑगस्टला शिवविच्छेदनानंतर शव तिच्या परिजनाचे हवाले करण्यात आले.