सेलू: सिंदी (रेल्वे) येथे नंदा नदीपात्रात पडून तरुणाचा मृत्यू, पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Oct 4, 2024 सिंदी (रेल्वे) येथे कांढळी रस्त्यावर असलेल्या नंदा नदीच्या पात्रात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ता. ३ गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली असून तो मृतदेह शहरातीलच रहिवासी नरेश दीपक परसे (३२) याचा असल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असल्याची माहिती आज ता. ४ शुक्रवारला सिंदी पोलिसांनी दिली.