सेलू: जामनी येथे ६० वर्षीय इसमास दगडाने मारून केले जखमी, आरोपी विरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 3, 2024 क्षुल्लक कारावरून वृद्धास दगडाने मारून जखमी केले. ही घटना तालुक्यातील जामनी येथे ता. ३ ऑक्टोबर गुरुवारी सकाळी ९.३० वाजताचे सुमारास घडली. किसना पांडुरंग दुधाने वय ६० वर्ष रा. जामनी असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजू ढोडरे रा. जामनी असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तक्रारीवरून सकाळी ११.५५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सेलू पोलिसांकडून सांगण्यात आले.