सेलू: हिंगणी, सालई (पेवठ) शिवारात सेलू पोलिसांची वॉशआउट मोहिम राबवत दारू भट्टींवर कारवाई, १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल नष्ट
Seloo, Wardha | Oct 3, 2024 पोलिसांनी वॉशआउट मोहीम राबवून गावठी दारूच्या भट्टयांवर कार्यवाही करून मोहा रसायन सडवासह 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला. ही कारवाई ता. 2 बुधवारी दुपारी 1 ते 4 वाजताचे दरम्यान मौजा हिंगणी, सालई (पेवठ) शिवारात सेलू पोलिसांनी केली. अशी माहिती आज दि. 3 गुरुवाराला सेलू पोलिसांनी दिली.