सेलू: सुरगाव शिवारातील गावठी दारूची भट्टी सेलू पोलिसांनी उध्वस्त करून ९८ हजाराचा मुद्देमाल केला नष्ट; आरोपी फरार
Seloo, Wardha | Oct 2, 2024 गावठी मोहा दारूच्या भट्टीवर पोलिसांनी रेट करून दारू भट्टी उध्वस्त करीत, गावठी मोहा रसायन सडव्यासह मोहा दारू असा ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल सेलू पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई ता.२ ऑक्टोबर बुधवारला सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान तालुक्यातील मौजा सुरगाव शेत शिवारात करण्यात आली. अतुल भगत रा. धानोली मेघे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली