कर्जत: शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्ग त्यावरील डांबरीकरण उधळले
वाहनचालक त्रस्त
Karjat, Raigad | Jul 5, 2025 शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्ग ५४८अ वरील कर्जत तालुका हद्दीत असलेल्या डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांनी डोके वर काढले आहे.हा राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रिटीचा बनविला आहे,मात्र काही ठिकाणी राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून या रस्त्यावर डांबरीकरण ठेवले आहे.दरम्यान त्या डांबरी रस्त्यावरून वाहतूक करणे वाहनचालक यांच्यासाठी धोकादायक बनले असून कशेळे आणि कळंब या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग गाव जोड रस्त्यांसारखा दिसून येत आहे.