हिंगणघाट: होमियोपॅथिक डॉक्टरांना एमएमसीअंतर्गत नोंदणी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, आयएमएचे उपविभाग अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन
हिंगणघाट :महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी ' पूर्ण केलेल्या होमियोपॅथिक डॉक्टरांना एमएमसी अंतर्गत नोंदणी करण्याची परवानगी देण्याबाबत ३० जून २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमुळे आधुनिक ॲलोपॅथिक प्रॅक्टिशनर्स मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन हिंगणघाट शाखेने या निर्णयाला 'सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका' असा आक्षेप घेतला आहे.शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे.