हिंगणघाट: वणा नदी पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी करून अवैध दारू वाहतूकी विरोधात कारवाई:८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी ४० लिटर अवैध दारू आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे.पोलिसांनी खबरदाराकडून माहिती मिळाली की एक व्यक्ती निळ्या मोटारसायकलवरून हिंगणघाटकडे दारूचा साठा घेऊन येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करत आरोपीला अटक केली.आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ४० लिटर अवैध दारू आणि निळी मोटारसायकल असा ८६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केली आहे.