हिंगणघाट: छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात वृक्षारोपण करून हरित एकादशी साजरी, हिंगणघाट पर्यावरण संवर्धन समितीची स्थापना
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर हिंगणघाटकरांनी पर्यावरण पूजनाचा नवा अध्याय लिहित छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ‘हिंगणघाट पर्यावरण संवर्धन समिती’ची स्थापना वृक्षारोपण करून करण्यात आली. हा उपक्रम शहराच्या पर्यावरण जपण्यासाठी उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. निसर्गाच्या रक्षणासाठी आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्यासाठी समितीचे हे पहिले पाऊल असून, स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ही या उपक्रमाची खास वैशिष्ट्ये ठरली.