हिंगणघाट: राष्ट्रीय महामार्ग वरील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानांतरीत करा:शरद पवार पक्षाचे नेते वांदिले यांची गडकरी यांच्याकडे मागणी
हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळील लोखंडी पूल येथील वणा नदीवर स्थानांतरीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन नितीनजी गडकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन ना. नितीनजी गडकरी यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत त्वरित या पुलाबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश दिले व पूल उत्तम स्थितीत असल्यास तो वणा नदीवर स्थानातरीत करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश दिले.