कौटुंबिक वादाचे भयावह रूप! मुलगा-सुनेला चिरडण्याचा वडिलांचा प्रयत्न; CCTV मध्ये थरार कैद...
.
.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा परिसरातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती आणि कौटुंबिक वादाचा राग मनात धरून एका वडिलांनी आपल्याच मुलाला आणि सुनेला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर थेट भरधाव कार घातली.
या जीवघेण्या हल्ल्याचा संपूर्ण थरार परिसरातील एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये साफ दिसत आहे की कशाप्रकारे मुलगा आणि सून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत आहेत आणि मागून भरधाव कार त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेमुळे तिवसा परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.
.
.
.
#AmravatiCrime #TivsaNews #CCTVFootage #CrimeNewsMarathi #KoutumbikVad #AmravatiNews #BreakingNews #CrimeDiary
Haveli, Pune | Jun 23, 2026