शहादा: मामाचे मोहिदे येथे हरभऱ्याचे झाडे उपटल्याचा राग आल्याने २ जणांना शिवीगाळ करून मारहाण
शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदा येथील शेतातून हरभऱ्याचे २-३ झाडे उपटल्याचा राग आल्याने २ जणांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात लडूभाई पाटील रा.मामाचे मोहिदा ता. शहादा यांच्याविरुद्ध बादल लड्डू ठाकरे रा.औरंगपूर ता.शहादा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पवार करीत आहेत.