शहादा: नंदुरबार बाहेरपुरा परिसरात संत रोहिदास महाराज जयंती निमित्त भव्य शोभायात्रा
नंदुरबार येथील बाहेरपुरा परिसरातील संत रोहिदास चौकापासून संत रोहिदास जयंतीनिमित्त चर्मकार समाजातर्फे सायंकाळी ५ वाजता समाज बांधवांनी भव्य अशी शोभायात्रा काढली यावेळी समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .येथील बाहेरपुरा परिसरातील चर्मकार समाजातर्फे संत रोहिदास जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यादरम्यान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.