राळेगाव: सरपंच रवी चौधरी यांना महाराष्ट्र रत्न गुणगौरव पुरस्कार
राळेगाव तालुक्यातील पिंपळापूरचे माजी सरपंच रवी चौधरी यांचा २७ सप्टेंबरला पुण्यात आदर्श सरपंच म्हणून महाराष्ट्र रत्न गुणगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन दवणे, जितेंद्र दाते आणि वंदना जाधव उपस्थित होते.