पोलीस स्टेशन मौदा हद्दीत येत असलेल्या नागपूर-भंडारा महामार्गावरील मारोडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास मौदा पोलीस करीत आहेत.