रामटेक: वाहीटोला येथे टिप्पर व कार मध्ये धडक; थोडक्यात बचावले कार प्रवासी
Ramtek, Nagpur | Aug 16, 2026 रविवार दिनांक 16 ऑगस्टला सकाळी साडेपाच ते सहा वाजता च्या दरम्यान रामटेक मनसर मार्गावरील वाहीटोला येथील भाजपा नेता उदयसिंह उर्फ गज्जू यादव यांचे घरासमोर एका टिप्पर व विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार मध्ये धडक बसली. या दुर्घटनेत टिप्पर डिव्हायडर वर चढला. तर कारचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला. सुदैवाने कारमधील दोन्ही एयर बॅग वेळेवर उघडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले.