भोकरदन: भोकरदन जालना महामार्गावर केदारखेडा गावाजवळ बस व दुचाकी अपघात होऊन ठार झालेल्या दोन तरुणांची ओळख पटली
आज दिनांक 26 जुलै 2025 वार शनिवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन जालना या मुख्य महामार्गावर भोकरदन तालुक्यातील केदारखेडा या गावाजवळ काल दिनांक 25जुलै 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बस व दुचाकीचा भीषण अपघात होऊन 2 तरुण ठार झाले होते. सदर तरुणांची ओळख पोलिसांना पटली नव्हती पोलिसांनी अखेर या तरुणांची ओळख पटवली आहे, विकास किशोर जाधव व 23 वर्षे राहणार चंदनझिरा तर भूषण गंगाराम लोखंडे राहणार अवघडराव सावंगी अशी मयताची नावे आहे.