भोकरदन: वडशेद येथे आमदार संतोष पाटील दानवे यांनी दिली भेट ,साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद
आज दिनांक 24 जुलै 2025 वार गुरुवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील वडशेद येथे गावाला भेट देत गावातील ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे, याप्रसंगी गावकरी ही विविध मुद्द्यावर संवाद साधत त्यांनी आणि अडचणी जाणून घेतले आहे यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व शेतकरी बांधव हे मोठ्या संख्येने आमदार संतोष पाटील दानवे यांच्या भेटीसाठी उपस्थित झाले होते.