धुळे: निमगुळ गावात महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणुकीच्या आयोजन
Dhule, Dhule | Aug 25, 2024 धुळे तालुक्यातील निमगुळ गावातील महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गावात महादेवाची पिंड, नंदी, घंटा यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता रांगोळी आणि फुलांनी सजवला होता. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने शिवलिंगाच्या मूर्तीचे पूजन करून या मिरवणुकीचे स्वागत केले.