धुळे: पांझरा नदी पात्रात पोहण्यासाठी छोट्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुण बेपत्ता
Dhule, Dhule | Aug 25, 2024 धुळे शहरातील सावरकर पुतळ्याजवळील पुलावरून दुपारी एका तरूणाने पोहण्यासाठी पांझरा नदी पात्रात उडी घेतली. त्यानंतर तो पाण्यात बेपत्ता झाला. याबाबत कळताच देवपूर पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच धुळे महानगरपालिका अग्निशामक विभागाच्या पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. अमिर रज्जाक पिंजारी असे बेपत्ता तरूणाचे नाव असून तो परिसरातीलच रहिवासी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी परिसरात नातेवाईकांची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे.