ब्रेकींग न्युज
लातूर-तुळजापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
लातूर : लातूर-तुळजापूर महामार्गावर अज्ञात आंदोलकांनी टायर जाळून जोरदार घोषणाबाजी केली. कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
औसा तालुक्यातील तावशी येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे मागील चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना शासन दखल घेत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
आंदोलकांनी शासनाने तात्काळ लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
#LaturNews #LaturBreaking #LaturTuljapurHighway #Tawshi #KoradaDushkal #ShetkariAndolan #ChhavaSanghatana #VijaykumarGhadgePatil #Ausa #LaturDistrict #MaharashtraNews #PrimeLive
Latur, Latur | Sep 25, 2026