कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या वतीने दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात स्वच्छता व वृक्षसंवर्धन अभियान; पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश
कल्याण : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना कल्याण पूर्व शाखेच्या वतीने कोळशेवाडीमध्ये "दादासाहेब गायकवाड क्रीडांगण स्वच्छता व वृक्ष संवर्धन अभियान" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विविध मान्यवरांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या अभियानादरम्यान स्वच्छ परिसर, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. यावेळी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
Kalyan, Thane | Jun 7, 2026