भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने कोळशेवाडीतील सिद्धार्थ नगर बगीचा, दादासाहेब गायकवाड क्रीडांगणासमोर वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
कल्याण पूर्व येथील लाडक्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी युवा मोर्चा मराठा कोळशेवाडी मंडळ तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सिद्धार्थ नगर बगीचा, दादासाहेब गायकवाड क्रीडांगणासमोर, कोळशेवाडी येथे वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष हेच शुद्ध हवा, समृद्ध निसर्ग आणि निरोगी जीवनाचे आधारस्तंभ असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक निलेश शिंदे, अनुसूचित जाती-जम�
Kalyan, Thane | Jun 7, 2026