हवेली: कदमवाकवस्ती येथे पोलिस हवालदाराकडून शिक्षिका पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करुन दिली जीवे मारण्याची धमकी
Haveli, Pune | Nov 5, 2025 कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदाराने पेशाने शिक्षिका असलेल्या पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. तर सासरकडील मंडळींनी पिडीतेच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात केल्याचेही समोर आले आहे.हा धक्कादायक प्रकार सन 2014 ते 2024 यादरम्यान कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडला.