अंबरनाथ: बदलापूर पश्चिम भागात श्रीराम महोत्सव २५ फूट उंच उभारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती
बदलापुर शहरात आमदार किसन कथोरे याच्या मार्फत बदलापूर नागरिकांसाठी श्रीराम महोत्सवाचा आयोजन करण्यात आला आहे. या महोत्सवात श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. 18 फूट लांब आणि 25 फूट उंच अशी ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. तसेच या श्रीराम महोत्सवात प्रभू श्रीराम कथेवर आधारित भव्य असे चित्र प्रदर्शन ठेवण्यात आले आहे