बदनापूर: बौद्ध समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली अबकड वर्गीकरण रद्द करण्याची मागणी
Badnapur, Jalna | Jul 16, 2026 आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर तहसील कार्यालय येथे सकल बौद्ध समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की राज्य सरकारने जो निर्णय हाती घेतला आहे तो निर्णय म्हणजे अनुसूचित जातीच्या मध्ये अ ब क ड वर्गीकरण करण्याचा त्यामुळे आरक्षण संपेल, समाजाचा विकास होणार नाही, त्यामुळे हे आरक्षण वाचवण्यासाठी सकलबद्ध समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन आरक्षण जशी आहे तसेच ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.