भोकरदन: आमदार निवासस्थानी नवनीत उपविभागीय अधिकारी बी.सरवन यांनी दिली भेट
आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ वार गुरुवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन चे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी बी सर्व यांनी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या भोकरदन येथील आमदार निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे, याप्रसंगी भोकरदन जाफराबाद तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी व त्यांचे खोळमलेले कामे त्वरित करण्याच्या सूचना यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांनी उपविभागीय अधिकारी बी.सरवण यांना दिले आहे.