भोकरदन: बस स्थानक परिसरात पाकीटमार करणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत घेतले ताब्यात,2लाख13 हजाराचा मु. जप्त
आज दिनांक 5 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4वाजता भोकरदन बस स्थानक परिसरात प्रवाशाचे पाकीट मार करून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत रिंग रोड परिसरात ताब्यात घेतले आहे,यामध्ये 3चोरट्यांना ताब्यात घेतल्या असून 1 चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. यांच्या ताब्यातून 1 रिक्षा ,1 रियलमी कंपनीचा मोबाईल रोख300 हजार रुपये असा एकूण 2 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.