नागपूर शहर: शर्टाच्या अस्तीन मध्ये आरोपीने लपवून ठेवली होती एमडी, गणेश पेठ पोलिसांनी केले जेरबंद : अतुल तवाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गणेश पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांनी 21 ऑगस्टला दुपारी 4 वाजता दिलेल्या गणेशपेठ पोलिसांनी कॉटन मार्केट परिसरात सापळा रचून ई-रिक्शातून एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. अमोल गायकवाड असे या जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांनी दिली आहे.