अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिम येथील शारदा चौक ते पत्रापेटी परिसर पर्यंत आमदार किणीकर यांच्या हस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
आज शुक्रवार दिनांक १ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ च्या दरम्यान अंबरनाथ पश्चिम येथिल शारदा चौक ते पत्रापेटी परिसर पर्यंत विशेष रस्ता अनुदान अंतर्गत व आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या निधीद्वारे रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर रस्त्या करिता शिवसेना उत्तरभारतीय प्रमुख प्रमोद कुमार चौबे तसेच माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी प्रदीप पाटील, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.